“आस्तिक म्हणायचे की नास्तिक हे आपल्याला ठरवावं लागेल, शरद पवारांबाबतही तसंच आहे”

Content Team
Published:

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथील सभेत महाविकास आघाडी मधील नेत्यांवर बॉम्ब टाकत जोरदार टीका केली होती. त्यानंतर महाविकास आघडीमधील नेत्यांनाही राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी पवार कुटुंबियाला निशाणा बनवल्याचे दिसत होते. त्यातली त्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक आणि कडव्या शब्दात टीका केली आहे. आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांचे वडील राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनीच राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

राजेंद्र पवार म्हणाले, राज ठाकरे आस्तिक आणि नास्तिकतेबद्दल बोलल्याचं समजलं. मी संत गाडगेबाबा यांचा अभ्यास केलाय. त्यांची अनेक पुस्तकं वाचली. गाडगेबाबांनी अनेक घाट उभारले, झाडले, धर्मशाळा बांधल्या.

गाडगेबाबा मंदिरात जात होते की नव्हते हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळे त्यांना आस्तिक म्हणायचे की नास्तिक हे आपल्याला ठरवावं लागेल. शरद पवारांबाबतही तसंच आहे. राज्यातील अनेक मंदिरांच्या विकासात त्यांचा सहभाग असावा.

बारामतीतही त्यांनी जिर्णोद्धार केलेली अनेक मंदिरं आहेत. आमच्या सर्व निवडणुकांचा प्रचार कन्हेरीतून होतो. 1967 पासून आम्ही परंपरा जपली आहे. बऱ्याचदा त्यांची पावलं या मंदिराकडे वळल्याचं आम्ही पाहत आलोय.

वेळ असेल तेव्हा मंदिरात दर्शनासाठी जातात. असं असताना त्यांना आस्तिक म्हणायचं की नास्तिक हे आपल्याला ठरवावं लागेल.

एखाद्यानं भगवं वस्त्र परिधान केलं किंवा भगवा गंध लावला, धार्मिक वस्त्र परिधान केले म्हणजेच आस्तिक होतो असं मला वाटत नाही अशा शब्दात राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार यांनीही राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, माझा धर्म आणि देव याचं मी प्रदर्शन करत नाही. मी निवडणुकीत देवधर्म आणत नाही. मी एकाच मंदिरात जातो. बारामतीत. त्याचा मी गाजावाजा करत नाही.

माझ्यापुढे काही आदर्श आहेत. प्रबोधनकार ठाकरे हे माझे आदर्श आहेत. त्याचं लिखाण वाचलं तर त्याचं सविस्तर मार्गदर्शन होईल. देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रबोधनकारांनी टीका केली.

गैरफायदा घेणाऱ्या घटकाला ठोकून काढण्याचां काम प्रबोधनकारांनी केलं. आम्ही प्रबोधनकारांचं लिखाण वाचतो. कुटुंबातील लोकं वाचत असतील असं नसाव. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe