अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात उन्हाची झळ सर्वात जास्त बघायला मिळत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad) येथे देखील उन्हाची दाहकता प्रचंड वेगाने वाढत आहे.
औरंगाबाद तालुक्यातील विहिरीतील पाण्याची पातळी जलद गतीने कमी होऊ लागली आहे. यामुळे रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिकांना मोठा फटका बसत असून फळबाग व उन्हाळी हंगामातील (Summer Season) पिके करपायला सुरुवात झाली आहे.
यामध्ये तालुक्यातील केळीच्या बागांना (Banana Orchard) मोठा फटका बसत आहे. विहिरीतील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पाण्याअभावी केळीच्या बागा होरपळत आहेत.
यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे मात्र असे असले तरी पिकविण्यात केळी पिकाचा समावेश नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
उन्हाळा जाण्यास अजून दीड ते पावणे दोन महिन्याचा कालावधी बाकी आहे मात्र आत्ताच औरंगाबादमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती बघायला मिळत आहे.
असे असले तरी प्रशासनाने अद्यापही कुठल्याच ठोस उपाययोजना हाती घेतलेल्या नाहीत. औरंगाबाद तालुका कृषी विभाग तसेच महसूल विभाग जणूकाही हातावर हात धरून बसलेले आहेत.
वाढत्या उन्हामुळे केळीच्या बागा होरपळून जात आहेत तर आता आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांकडे भांडवल म्हणून एक छदामही राहिलेला नाही.
यामुळे खरीप हंगामाचे नियोजन आणि पेरणी साठी येणारा खर्च कसा उपलब्ध करायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा आहे.
खरीप हंगामासाठी आवश्यक खते बियाणे यासाठी शेतकरी बांधवांकडे सध्या पैसाच उपलब्ध नाही. यात अजून केळीच्या बागा, तसेच रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके होरपळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कवडीमोल उत्पन्न मिळणार आहे, यामुळे उन्हाळी हंगामाच्या झळा खरीप हंगामात देखील बघायला मिळणार आहेत.
एकीकडे नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडले आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
खरीप हंगामासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बुधवारी महसूल आणि कृषी विभागाची संयुक्त आढावा बैठक पार पडणार होती.
ही संयुक्त बैठक तहसील कार्यालयात आयोजित केली जाणार होती या बैठकीत खरीप हंगामात शेतकरी बांधवांना कोणत्या योजनेचा लाभ देता येईल याबाबत विस्तृत चर्चा केली जाणार होती.
मात्र, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप असल्यामुळे ही बैठक पार पडण्यापुर्वीच संपुष्टात आल्याचे चित्र बघायला मिळाले.