खरं काय! Pm Kisanच्या अपात्र शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवला जाणार; योजनेच्या वसुलीला गती

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Government scheme  :- पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या (Pm Kisan Sanman Nidhi Yojna) शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने (Nashik District Collector) पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक करण्याचे आदेश दिले असून या योजनेच्या अपात्र शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित केले जावे असे सांगितले.

एवढेच नाही तर या अपात्र शेतकऱ्यांकडून (Ineligible Farmer Of Pm Kisan) योजनेची रक्कम देखील वसूल करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल आणि अशा शेतकऱ्यांकडून वसुली करणे अवघड होत असेल तर संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविला जाणार आहे.

यासाठी राष्ट्रीयकृत बँकांची मदत देखील घेतली जाणार आहे. पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची (Modi Government Scheme) एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 90 हजार शेतकरी लाभ घेत आहेत.

या 90 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हफ्ता देखील प्राप्त झाला आहे. येत्या काही दिवसात या योजनेचा अकरावा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

अकरावा हप्ता प्राप्त शेतकऱ्यांना देण्यापूर्वी या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता अपडेट केल्या जात आहेत. यादरम्यान, ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून अजुनही पुरेशी रक्कम वसूल करण्यात आलेली नाही एव्हाना या अपात्र शेतकऱ्यांनी देखील योजनेची रक्कम सरकारदरबारी हस्तांतरित केलेली नाही म्हणून आता अशा अपात्र शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा लावण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.

या योजनेचा ज्या अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता त्या शेतकऱ्यांना योजनेची रक्कम परत करण्यास सूचना केल्या गेल्या होत्या. शासनाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे 6100 अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा निधी परत केला आहे.

मात्र अजूनही पुरेशी वसुली झालेली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. अशा अपात्र शेतकऱ्यांना वारंवार सूचना देऊनही संबंधित शेतकऱ्यांनी योजनेची रक्कम हस्तांतरित केलेली नाही.

म्हणून प्रशासनासमोर या अपात्र शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र आता कुठलीही दिरंगाई न बाळगता अशा अपात्र शेतकऱ्यांकडून योजनेची रक्कम वसूल करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना केल्या जाणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात सुमारे 18 हजार शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरवले आहेत. या 18 हजार शेतकऱ्यांपैकी 13 हजार शेतकरी तर आयकर भरणारे आहेत.

यामुळे या अपात्र शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे राहिले आहे. त्यामुळे आता अशा अपात्र शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

त्या अनुषंगाने सूचना देखील तालुका पातळीवर देण्यात आल्या आहेत. असे असले तरी याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

मात्र हाती आलेल्या माहितीनुसार, आता पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांकडून जलद गतीने वसुली केली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe