Sovereign Gold : काय सांगता!!! होळी दिवशी सोने खरेदी करता येणार फक्त 5,511 रुपयांना, काय आहे ऑफर जाणून घ्या

Published on -

Sovereign Gold : येत्या काही दिवसात होळीचा सण आहे. हा सण देशात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. होळीच्या मुहूर्तावर काही जण सोने खरेदीला पसंती देतात. लवकरच देशात लग्नसराईचा हंगाम सुरु होणार आहे. अशातच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण तुम्ही आता होळीच्या दिवशी खूप स्वस्तात सोने खरेदी करू शकता. होय, तुम्ही आता RBIआर्थिक वर्ष 2022-23 साठी सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या चौथ्या मालिकेअंतर्गत सोन्याची विक्री करत आहे. याचा फायदा घुएन तुम्ही फक्त 5,511 रुपयांना सोने खरेदी करू शकता.

फक्त 5,511 रुपयांना खरेदी करा सोने

या सिरीजअंतर्गत कोणताही गुंतवणूकदार आता सार्वभौम सोने खरेदी करू शकतो. यासाठी इश्यूची किंमत 5,561 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. इतकेच नाही तर आता ऑनलाइन पेमेंट केले तर तुम्हाला 50 रुपयांची सूट दिली जाईल. म्हणजेच एक ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला फक्त 5,511 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ही सोने खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

जर त्याच्या खरेदीबद्दल बोलायचे झाल्यास, तर गुंतवणूकदार स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे खरेदी करू शकतात.हे लक्षात घ्या की ते स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेत विक्री केली नाही.

जर यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही जास्तीत जास्त 4 किलो सोन्याचे रोखे खरेदी करू शकता. तसेच जर आपण ट्रस्ट किंवा कोणत्याही संस्थेबद्दल बोललो तर ते 20 किलोपर्यंतचे बाँड खरेदी करू शकतात.

हा एक प्रकारचा सरकारी बॉण्ड असून ही योजना आरबीआयकडून जारी करण्यात आली आहे. सरकारने त्याची सुरुवात 2015 मध्ये केली. तुम्ही ते सोन्याच्या वजनासाठी खरेदी करू शकता. जर हा बॉण्ड 5 ग्रॅमचा असल्यास तर हे समजून घ्या की त्याची किंमत 5 ग्रॅम सोन्याइतकी असणार आहे.

जाणून घ्या सार्वभौम गोल्ड बाँडशी निगडित गोष्टी

  • गोल्ड बाँड (सार्वभौम सोने) दर सदस्यता कालावधीच्या मागील आठवड्याच्या शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसांमध्ये 999 शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी दराच्या आधारावर निर्धारित करण्यात येतात. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) 999 शुद्ध सोन्याचे दर प्रकाशित करते.
  • आता गुंतवणूकदारांना ऑनलाइन अर्ज आणि पेमेंटवर 50 रुपयांची सूट मिळत आहे.
  • बाँडची विक्री स्मॉल फायनान्स आणि पेमेंट बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, निवडक पोस्ट ऑफिस, NSE आणि BSE व्यतिरिक्त अनुसूचित व्यावसायिक बँकांद्वारे केली जाणार आहे.
  • गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या नाममात्र मूल्यावर दर सहा महिन्यांनी वार्षिक 2.5 टक्के दराने व्याज उपलब्ध करून देण्यात येईल.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe