काय सांगता: लघुशंका करण्यासाठी गेला अन मोटारसायकल गमावून आला…!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  सध्या चोरटे कधी, काय, कसे चोरून नेतील हे सांगता येणार नाही. कारण घटनाच तशी घडली आहे. लघुशंका करायला गेलेल्या एकाची मोटारसायकल भामट्याने चोरून नेली आहे.(crime news)

येथील श्रीगोंदा पारगाव रोडवर असलेल्या महात्मा गांधी उद्यानाजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयासमोर मोटारसायकल उभी करून लघुशंका करायला गेलेल्या राजेंद्र हजारे यांची ३० हजार रूपये किमतीची सुपर स्पेंल्डर (एमएच १६ सीजे ४२७९) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी राजेंद्र दत्तात्रय हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास पोनाख़ारतोडे हे करत आहेत.

तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांत वाढ होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र चांगलेच वैतागले आहेत. तरी पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe