अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या काळात सर्व रुग्णालये फुल असताना आ. निलेश लंके यांनी कोवीड सेंटर सुरु करून हजारो लोकांचे प्राण वाचवत अनेक कुटुंब उद्धवस्त होण्यापासून वाचवले .
आ. लंके यांचे पुढील भविष्य अतिशय उज्जवल आहे . राष्ट्रवादीला एक साजेसा आमदार लोकांनी दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आ. लंके यांनामोठी संधी मिळणार असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे विधान परीषद अध्यक्ष अमोल मिटकरी यांनी केले .
नगर तालुक्यातील वडगाव गुफ्ता येथील सीना नदीवरील पुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते . यावेळी मिटकरी म्हणाले कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासळली असताना देखील आ. लंके यांनी मतदार संघात शंभर कोटी रुपयाच्या निधीचे काम आणले.
त्यांची काम करण्याची पध्दत पाहून त्यांची कोणीही बरोबरी करु नये . राष्ट्रवादीला स्व.आर.आर. आबा याची उणीव होती ती निलेश लंके याच्या रूपाने भरूण निघाल्याचा भास होतो.
लंके यांनी मतदार संघात विकासाची गंगा आणली . त्याच्या कामाची पध्दत पाहून विद्यार्था त्यांच्या नावावर पीएचडी करतील.
साधा झोपडीत राहणारा नेता महाराष्ट्राचे भविष्य असेल, याबाबत भाजपच्या मनात शंका नाही एवढे काम लंके यांनी केले.अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम