काय सांगता! हिंदकेशरी नाग्या बैलाचा प्रकटदिन साजरा; गावकऱ्यांना जेवणाची पंगत

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Oxen news : शेतीक्षेत्राच्या प्रारंभीपासून शेतीमध्ये बैलांचे मोलाचे सहकार्य राहिले आहे. दावणीला बांधलेले बैल (Oxen) आणि शेतकरी बांधव यांच्यात एक अतुट नाते असते.

काळाच्या ओघात शेतीमध्ये आधुनिकतेची झलक दिसत असली आणि शेती कार्यात बैलांचा वापर कमी झाला असला तरीदेखील शेतकरी बांधवांसाठी (Farmers) आपल्या बैलाचे स्थान ते आधीच सारखेच हृदयात आहे.

शेतकरी आणि दावणीला असलेला बैल यांच्यातील नाते जणूकाही पिता पुत्रा प्रमाणेच असते. याचे महत्त्व अधोरेखित करणारी नाना प्रकारची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आली असतील.

आज आपण दावणीला बांधलेला बैल एका शेतकऱ्यासाठी काय स्थान ठेवतो याविषयी जाणून घेणार आहोत. पाखरे कुटुंबीयांनी आपल्या बैला प्रति असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी चक्क बैलाचा वाढदिवस साजरा (Celebrate the bull’s birthday) केला.

शेती कार्यात आपल्या खांद्याला खांदा लावुन काम करणाऱ्या बैलाचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना सुचणे मुळात ही बाबच मनाला सुखदायक बनवत आहे.

आपल्या सदस्या सारख्या असणाऱ्या लाडक्या बैलाचा वाढदिवस दिमाखात साजरा करणाऱ्या पाखरे कुटुंब खरंच खूप ग्रेट आहे.

चला तर मग हिंदकेसरी नाग्या बैलाचा प्रकट दिन सोहळा कसा पार पडला जाणून घेऊया. कारभार गल्ली वडगाव येथील रहिवासी शेतकरी परशुराम पाखरे व संजीव पाखरे यांनी आपल्या नाग्या बैलाचा वाढदिवस साजरा केला.

या शेतकरी कुटुंबियांचे आपल्या दावणीला बांधलेल्या बैलावर नितांत प्रेम यामुळेच ही नामी कल्पना या कुटुंबीयांना सुचली. पाखरे कुटुंबीयांचा नाग्या बैल या कुटुंबीयांचे नाक आहे या बैलाने आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक शर्यतीत भाग घेतला आहे.

अनेक शर्यतीत पाखरे यांच्या बैलाने पारितोषिकं देखील पटकावली आहेत. त्यांच्या बैलजोडीने महाराष्ट्रात तसेच कर्नाटक मध्ये देखील अनेक शर्यतीत पारितोषिके पटकावली आहेत.

नाग्या या बैलाने देखील शर्यतीत चांगले काम केले आहे. या बैलाने आणि पारितोषिके आपल्या नावावर केली आहेत. या बैलाला म्हणूनच हिंदकेसरी नाग्या असं म्हणून संबोधले जाते.

या बैलाचा वाढदिवस दोन एप्रिल ला येतो. यामुळे या दिवशी पाखरे कुटुंब आपला आनंद गावकर्यां समवेत साजरा करतात. हिंदकेसरी नाग्या बैलाच्या वाढदिवसाला सुमारे सातशे लोकांना जेवणाची पंगत देण्यात आली होती. यामुळे या बैलाचा वाढदिवस पंचक्रोशीत चांगलाच चर्चेत आहे.