काय सांगता : ‘त्या’ दोघांनी चोरल्या चक्क बांगड्या?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनामुळे मानवाच्या जीवनावर अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. त्यात एकीकडे कोरोनामुळे ठप्प झालेले व्यवसाय व वाढलेली प्रचंड महागाईमुळे आधीच बेजार झालेल्या नागरिकांना आता चोरट्यांचा देखील सामना करावा लागत आहे.

हल्ली चोरटे देखील कोणती वस्तू चोरतील ते सांगता येत नाही. आतापर्यंत मौल्यवान वस्तू, पैसे, वाहने अशा प्रकारच्या वस्तू चोरायचे मात्र आता शेळ्या, गायी, किराणा. मात्र आता तर हद्दच केली असून चक्क बांगड्या चोरल्याची घटना घडली आहे.

कोपरगाव शहरातील गौरव सत्यनारायण अग्रवाल यांच्या बांगड्यांच्या गोदामाचे शटर तोडून अज्ञात चोरांनी गोदामामधील विविध रंगांच्या ३०० बांगड्यांचे गठ्ठे लंपास केले आहेत.

याप्रकरणी अग्रवाल यांनी कोपरगाव शहर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी तपास करत दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून काही बांगड्यांचे गठ्ठे व गुन्ह्यात वापरलेली होंडा ॲक्टिव्हा असा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पैकी एक महिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News