काय सांगता ! सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर करोडो रुपये उडवतात ‘ह्या’ अभिनेत्री

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- बॉलीवुड आणि बॉलीवुडमध्ये केले जाणारे अनेक प्रयोग हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आता हेच पहाना बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करतात .

कारण बॉलीवूडमध्ये सुंदर दिसण्यासास खूप जास्त महत्व आहे. जर तुम्ही सुंदर दिसत असाल तर तुम्हाला यश मिळणे अधिक सोप्पे जाते. त्यामुळे बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री स्वताच्या चेहऱ्याला प्लॅस्टिक सर्जरी करून घेतात. प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो.

या बरोबरच प्लॅस्टिक सर्जरी किती यशस्वी होईल हे देखील सांगता येत नाही. आपल्या अदांनी वेड लावणाऱ्या या तारकांच्या सौंदर्यामागे मेकअपचा मोठा वाटा असतो.

आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींचे फोटो दाखवणार आहोत ज्या पडद्यावर आकर्षक दिसतात आणि विदाऊट मेकअप त्यांचा लूक खूप वेगळा दिसतो. अनेकजण त्यांना मेकअपशिवाय ओळखूही शकणार नाहीत.

पूजा भट्ट :- दिल है के मानता नही, सडक यांसारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री पुजा भट्ट खऱ्या आयुष्यात अनेकदा विदाऊट मेकअप दिसून आली आहे. मोठ्या पडद्यावर सुंदर दिसण्यासाठी पूजा सुरूवातीपासूनच महागड्या प्रोडक्टसचा वापर करत आली आहे. मेकअपशिवाय पूजा भट्टला तुम्ही ओळखूही शकणार नाही.

सोनम कपूर :- बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपला फॅशन सेन्स आणि नो मेकअप लूकमुळे बरीच चर्चेत असते. सोनम डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स घालवण्यसाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करते. व्हायरल झालेल्या एका फोटोत सोनम आपल्या डोळ्यांखाली कन्सिलर लावताना दिसून येत आहे.

माधुरी दीक्षित :- बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितला तिच्या सौदर्याच्या बाबतीत कोणीही टक्कर देऊ शकत नाही. वयाच्या ५४ व्या वर्षांतही तिचे अनेक चाहते आहेत. माधुरीने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. माधुरी जेव्हा पहिल्यांदा सिने जगतात आली तेव्हा तिच्या त्वचेवर बरेच डाग दिसून येत होते. हे डाग लपवण्यासाठी माधुरीला महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करावा लागत होता.

दीपिका पदुकोण :- बॉलिवूडमध्ये दीपिका पदकोण आपलं काम आणि मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. दीपिका स्वतःला सुंदर बनवण्यासाठी खूप पैसे खर्च करते. सोशल मीडियावर दीपिकाचे जुने फोटो पाहून अनेकजण हैराण होतात. कारण तेव्हाचे मेकअपशिवायचे फोटो आणि आताचे फोटो यात बराच फरक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe