Aadhaar And PAN Card : व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मतदार ओळखपत्र, आधार आणि पॅन कार्डचे काय होते? जाणून घ्या सविस्तर

Published on -

Aadhaar And PAN Card : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँकेतील कोणतेही काम असेल तिथे पॅन कार्ड आधारकार्ड गरजेची असतात. जर ही कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर कामात अडथळा येतो.

परंतु हे लक्षात घ्या की ही कागदपत्रं व्यक्ती हयात असताना गरजेची असतात, परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या कागदपत्रांचे काय होते? या मृत व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर तर होणार नाही ना ? असे अनेक प्रश्न पडतात. जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.

1. पॅन कार्ड

पॅन कार्डचा वापर हा व्यवसाय ओळखपत्र म्हणून करण्यात येतो. कोणतेही आर्थिक असो ते काम पूर्ण करण्यासाठी हे पॅन कार्ड अतिशय गरजेचे आहे. जर एखादी व्यक्ती मरण पावली तर त्याचे काय होत असा सवाल अनेकांना पडतो.

त्या व्यक्तीच्या पॅन कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता दाट असते. जर तुमच्या घरात कोणी मरण पावले तर तुम्ही ताबडतोब आयकर विभागाशी संपर्क साधून त्याचे पॅन कार्ड सरेंडर करा.

2. आधार कार्ड

वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड सरेंडर करण्याचा कोणताही पर्याय नसतो. तुम्ही त्या मृत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करून मिळवू शकता.

3. मतदार ओळखपत्र

मतदानासाठी मतदार ओळखपत्र लागते. त्यामुळे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण ते नसेल तर आपण निवडणुकीत मतदान करू शकत नाही. जर एखादी व्यक्ती मरण पावली तर तुम्हाला फॉर्म 7 भरून त्या व्यक्तीचे मतदार ओळखपत्र रद्द करता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News