e-Aadhaar : काय आहे ई-आधार? फायदे जाणून व्हाल चकित

Published on -

e-Aadhaar : आपले आधार कार्ड सुरक्षित ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी वापरकर्त्यांना ई-आधार वापरण्याचा सल्ला दिला जातो. UIDAI ऑनलाइन मोडद्वारे ई-आधार वापरण्याची सुविधा प्रदान करते.

अनेकजण ई-आधार वापरतात. ई-आधार कार्ड ते तुटण्याची किंवा हरवण्याची भीती नसते. जाणून घेऊयात ई-आधार कार्ड आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

काय आहे ई-आधार

तुमचे मूळ आधार कार्ड ज्या पद्धतीचे असते तसेच हे ई-आधार कार्ड डिजिटल स्वरूपात असते. त्यामुळे ते तुम्ही तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर-लॅपटॉप, पेनड्राइव्हमध्ये सहज ठेवू शकता. त्यामुळे ते फाटण्याचा किंवा हरवत नसून पूर्णपणे वैध आहे.

असे करा डाउनलोड 

स्टेप 1

  • जर तुम्हाला ई-आधार कार्ड वापरायचे असेल, तर तुम्हाला ते आधी डाउनलोड करावे लागेल.
  • त्यासाठी तुम्ही http://eadhaar.uidai.gov.inया वेबसाइटवर  जाऊ शकता.

स्टेप  2

  • तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • तेथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका
  • तसेच स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.

स्टेप 3

  • तुम्हाला Send OTP पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाकून लॉगिन वर क्लिक करा

स्टेप 4

  • तुमचे ई-आधार कार्ड डाउनलोड होईल
  • त्यात एक पासवर्ड असतो, जो सामान्यतः तुमच्या नावाची पहिली 4 अक्षरे मोठ्या अक्षरात आणि तुमचे जन्म वर्ष असते.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News