What Is Exit Poll : आज देशात दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 8 डिसेंबर रोजी दोन्ही राज्यातील मतमोजणी होणार आहे. यानंतर संपूर्ण देशाला दोन्ही राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे याची माहिती मिळणार आहे.
मात्र त्याआधी जनतेला कोणता पक्ष निवडून येणार आहे ? कोणाला किती जागा मिळणार ? याची माहिती देशातील वेगवगेळ्या वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलच्या मदतीने दाखवले जातात. हे पाहून तुम्हाला देखील कधी कधी प्रश्न पडत असेल कि एक्झिट पोल नेमकं काय असतो आणि ते कसे ठरवले जाते. चला तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचा उत्तर देतो.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/12/voters.jpg)
एक्झिट पोल हा केवळ मतमोजणीपूर्वी येणाऱ्या निवडणुकीच्या निकालांचा अंदाज असतो आणि मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे किंवा युतीकडे जाऊ शकतो हे सांगतो. एक्झिट पोल कधी कधी निकालांशी तंतोतंत जुळतात तर कधी उलट सिद्ध होतात.
मतदान पूर्ण झाल्यानंतरच एक्झिट पोलचे प्रसारण केले जाते. एक्झिट पोलमध्ये मतदारांना अनेक प्रश्न विचारले जातात, परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान केले आहे.
हजारो मतदारांकडून तत्सम प्रश्न-उत्तरे गोळा केली जातात, त्यांची आकडेवारी गोळा केली जाते आणि कोणत्या पक्षाला किती टक्के मते मिळतात, याचे विश्लेषण केले जाते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन (IIPU) चे प्रमुख एरिक डी’कोस्टा यांनी भारतातील एक्झिट पोल सुरू केले होते. भारतात 1998 मध्ये प्रथमच एक्झिट पोल प्रसारित करण्यात आले.
एक्झिट पोल काढण्यासाठी सर्व्हे एजन्सी किंवा न्यूज चॅनेलचा रिपोर्टर अचानक एखाद्या बूथवर जातो आणि तिथल्या लोकांशी बोलतो. एक्झिट पोलमध्ये प्रत्येक श्रेणीतील क्षेत्रनिहाय लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तो कोणाला प्रश्न करायचा हे आधीच ठरलेले नाही. मजबूत एक्झिट पोलसाठी हजारो मतदारांच्या मुलाखती घेतल्या जातात.
हे पण वाचा :- Top 3 Best Selling Cars : ‘ह्या’ तीन कार्सने मार्केटमध्ये घातला धुमाकूळ ! मोडले अनेक विक्रम ; किंमत आहे फक्त ..