Maharashtra news : एरवी प्रत्येक राजकीय घडामोडीवर भाष्य करून शिवसेनेवर टीका करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या मीडियाला भेटत नाहीत. त्यामुळे त्यांचे नेमके काय डावपेच सुरू आहेत? ते मीडियाला का टाळत आहेत? याबद्दल प्रश्न पडले आहेत.
त्यांच्याकडून मोठी राजकीय खेळीची तयारी सुरू असल्याने ते मीडियापासून दूर राहत असल्याचाही अंदाज आहे. शिवसेनेतील बंडामागे भाजपचा अर्थात फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. आमदारांची व्यवस्थाही भाजपच्या खर्चाने होत असल्याचा आरोप आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारी निवासस्थान सोडले. अशा अभूतपूर्व राजकीय घडामोडी सुरू असताना आणि त्याही वेळी चर्चेच्या केंद्रस्थानी फडणवीस हेच असताना त्यांनी मात्र स्वत:ला मीडियापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे नेमके काय सुरू आहे? पुढे काय खेळी केली जाणार? याबद्दल उत्सुकता लागली आहे.