रत्नागिरी : भाजप (BJP) नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा धाड सत्र कार्यक्रम चालूच असल्याचे दिसत आहे.
सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हंटले होते की, महाविकास आघाडीचा संसार असा आहे की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं (Shivsena) आहे. राष्ट्रवादी हा नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यांनी काही मनमानी करावी त्यांना कुणी काही बोलत नाही.
शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे. ती बिचारी खूप दु:खी आहे पण तिला बोलता येत नाही. तर काँग्रेस (Congress) हे वराती आहे. त्यांना लग्नाची पत्रिका नव्हती पण ते बिन बुलाये लग्नाला गेलेत. त्यांना लाज नाही.
त्यांना जेवायला कुणी बोलावलं नाही पण ते जेवणाचं ताट सोडेनात. त्यांना हाणलं, कुणी काही बोललं तर ते खाली बसून जेवायला तयार आहेत. पण जेवणाचं ताट काही सुटेना अशी घणाघाती टीका त्यांनी केली होती.
त्यानंतर आता जयंत पाटील यांनी खोचक शब्दात सुजय विखेंवर निशाणा साधला आहे. नवरा, बायको, पाहुणे अशी बिरुदावली आमच्यातील सगळ्यांना देत आहेत.
पण षंढांना काय बिरुदावली द्यायची, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात. त्यामुळे मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
तसेच काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनीही विखेंवर टीका केली होती. ते म्हणाले, काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार.
सुजय विखे पाटील याच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. कारण तो अजून मुलगा आहे असा चिंता देखील त्यांनी सुजय विखेला काढला होता.