पॅनिक अटॅक पासून दूर राहण्यासाठी काय करावे ?

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सध्याच्या काळात घाबरणे, भीती वाटणे या सळ्या समस्या लोकांच्या जीवनाचा भाग झालेल्या आहेत. अशावेळेस पॅनिक अटक येणं सामान्य गोष्ट झाली आहे.

असं का होतं आणि यापासून बचाव करण्यासाठी काव करायला हवे, जाणून घेऊ. . . सध्या जगात सर्वत्रच स्थिती बिघडलेली आहे. अशा वेळेस दररोज काहीतरी वेगळंच ऐकू येतं.

अशावेळेस भीती, चिंता वाटणे अतिशय साहजिक आहे. पण काही लोक जेव्हा याविषयी सतत विचार करतात किंवा त्रस्त राहतात, तेव्हा पॅनिक ऑअटॅकची शकयता वाढते. कोरोनामुळे अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

पॅनिक अटॅक काय आहे ? : – पॅनिक डिसरऑर्ड ही एक अशी मनः स्थिती आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्ती भिती आणि चिंतेखाली वावरत असते. ती व्यक्ती काहीवेळेस एवढी घाबरते की, तिला असं वाटतं की, आपल्याला एखादा मोठा आजार झालाय किंवा एखाद्या मोठ्या समस्येने ग्रासल आहे. त्या व्यक्तीचं हृदय वेगाने धडधडू लागली. पीडित व्यक्तीला असे वाटते की, त्याच्याबरोबर चुकीचं काहीतरी घडतंय.

चिंता मोठं कारण : – पॅनिक अँटॅक सामान्यत: त्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरतो, ज्या खूप जास्त चिंता करतात किंवा ज्यांच्या कुटुंबात एखादी व्यक्ती मानसिक स्थितीने ग्रस्त आहे.

त्या व्यक्तींना पॅनिक अटॅक येण्याची शक्‍यता अधिक असते. अशा व्यक्तींना प्रत्येक दुसऱ्या क्षणी ही चिंता सतावते की, आता माझं कसं होणार? त्यांना भीती वाटणे, घाम येणे, हाता-पायांमध्ये झिणझिण्या येणे, श्‍वास घेण्यास समस्या अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. पॅनिक अँटॅकचा कालावधी दहा मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ असू शकतो.

याची लक्षणं हार्ट अटॅक प्रमाणे दिसतात. पॅनिक डिसऑर्डर च्या इलाजासाठी आपल्या आहारामध्ये बदल करा. कॉगनिटिव्ह बिहेवियरल थेरपी घेऊ शकता. या थेरपीमध्ये आणि औषधांच्या माध्यमातून पॅनिक अँटॅकवर इलाज करू शकता. औषधांबरोबर सायकोथेरपी मुळे लवकर आराम मिळू शकतो.

पॅनिक अँटॅक च्या रुग्णांनी दारू किंवा कॉफीचे सेवन करता कामा नये. त्याचबरोबर संतुलित आहाराचे सेवन करावं. एकाच प्रकारच्या आहाराचं सेवन करू नका. फळं, ग्रीन टी यांचं सेवन कर. चांगला विचार करा, संस्मरणीय क्षणांविषयी विचार करा, मुलांबरोबर वेळ घालवा आणि व्यायाम कर.

 लक्षात ठेवा… : –

पॅनिक डिसओऑर्ड एक प्रकारची एंग्जायटी डिसऑर्डर आहे, याचं निदान तेव्हा होतं जेव्हा पॅनिक अटॅक पुन्हा पुन्हा येतो. जास्त अटॅक येण्याची स्थिती चिंताजनक होते.

पॅनिक अटॅक सतत येण्याने व्यवहाराशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

अटॅक परत येऊ नये याकरिता ज्या ठिकाणी किंबा ज्या स्थितीमुळे अटॅक आला आहे, ती स्थिती किंवा त्या ठिकाणी जाणं टाळा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe