Reliance Jio : रिलायन्स जिओ अनेकदा आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स घेऊन येते. अशातच आता रिलायन्स जिओने अशीच एक ‘जिओ सेलिब्रेशन ऑफर’ आणली आहे.
या ऑफरचा जिओच्या ग्राहकांनी फायदा घेतला तर त्यांना वर्षभर रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. काय आहे रिलायन्स जिओची ऑफर जाणून घेऊयात सविस्तर.
Jio च्या सदस्यांना 2,999 रुपयांच्या Jio सेलिब्रेशन ऑफरचा लाभ घेता येईल. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना 365 दिवसांची वैधता आणि दररोज 2.5GB डेटा मिळेल. त्याचबरोबर या प्लॅनसह रिचार्ज केल्यावर सदस्यांना अतिरिक्त फायद्यांचाही लाभ मिळेल.
दररोजचा खर्च 8.27 रुपये
त्याचबरोबर अमर्यादित कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळतील. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये सुमारे 912.5GB डेटा मिळेल. जर तुम्ही 365 दिवसांची वैधता पाहिली तर दररोजचा खर्च फक्त 8.27 रुपये इतका येईल.
जिओ अॅप्सची सदस्यता
यामध्ये जिओ अॅप्सची मोफत सदस्यता मिळते. त्यात JioTV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud यांचा समावेश आहे. तसेच, जर तुम्ही Jio च्या 5G सेवांसाठी पात्र असाल तर तुम्हाला अमर्यादित 5G डेटाचा लाभ घेता येईल.
मिळतील आणखी फायदे
या ऑफरमध्ये अनेक फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये Zoomin वरून रु.299 किमतीच्या 2 मिनी मॅग्नेटचा संच मोफत विकत घेण्याचा पर्याय मिळतो. याशिवाय, Ferns & Petals, Ixigo, Ajio आणि Reliance Digital सारख्या प्लॅटफॉर्मवर 750 रुपयांची सूट मिळते.