हे काय भलतंच? शिवसेनेच्या सभेला मनसेची ‘गर्दी’

Published on -

Maharashtra news : नकली हिंदुत्वाच्या विरोधात असली हिदुंत्ववाद्यांची सभा अशी जाहीरात करून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची मुंबईत १४ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे.

मात्र या सभेची जाहिरात (टिझर) करताना शिवसेनेकडून एक मोठी चूक झाली आहे. जाहिरातीत जे गर्दीचे फुटेज वापरले ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेचे असल्याचा दावा मनसेने केला आहे.

यावरून टीका सुरू होताच शिवसेनेने संबंधित ट्विट डीलीट केले आहे.शिवसेनेच्या टिझरमध्ये असलेली गर्दी राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेतील असल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे.

अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का? आता कळलं असली कोण आणि नकली कोण, असा टोलाही त्यांनी लागवला आहे.१ मे रोजी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली होती.

राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी १४ मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईच्या बीकेसी मैदानावर सभा घेणार आहेत. त्यासाठी जाहिरातबाजी सुरू असली तर त्यासाठी वापरण्यात आलेल्या गर्दीच्या फुटेजवरून आता नवा वाद सुरू झाला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News