WhatsApp ban : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने सप्टेंबर महिन्यात भारतात लाखो खात्यांवर बंदी घातली आहे. सप्टेंबरमध्ये प्लॅटफॉर्मवर 26.85 लाख खाती बॅन करण्यात आली होती. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, प्रतिबंधित खात्यांपैकी सुमारे 8.72 खाती वापरकर्त्यांनी तक्रार करण्यापूर्वीच बॅन करण्यात आली होती.
सप्टेंबरमध्ये बंदी घालण्यात आलेल्या खात्यांची संख्या ऑगस्टच्या तुलनेत 15% जास्त आहे. ऑगस्टमध्ये व्हॉट्सअॅपने 23.28 लाख खाती बंद केली. व्हॉट्सअॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर संशयास्पद खात्यांवर दर महिन्याला बंदी घातली आहे.
व्हॉट्सअॅपने बंदी घातलेल्या खात्यांचा तपशील दिला –
कंपनीने जारी केलेल्या ‘यूजर सेफ्टी रिपोर्ट’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार, ‘1 सप्टेंबर 2022 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान WhatsApp वर 26.85 लाख खाती बॅन करण्यात आली आहेत. यापैकी 8.72 लाख खाती वापरकर्त्याने तक्रार करण्याआधीच बॅन केली आहेत. भारतीय खाती +91 फोन नंबरद्वारे ओळखली जातात.
सप्टेंबर महिन्यात, 496 वापरकर्त्यांनी खाते बंद केल्याचा अहवाल दिला. एकूण अहवालांची संख्या 666 आहे. मागील वर्षी जारी झालेल्या आयटी नियमांनंतर WhatsApp दर महिन्याला मोठ्या संख्येने संशयास्पद खाती काढून टाकते.
चुकून बॅन केलेले खाते, तुम्ही अशा प्रकारे अनबॅन करण्याची विनंती करू शकता –
ज्या खात्यांबद्दल वापरकर्ते तक्रार करतात त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा काही यूजर्सचे अकाउंट चुकून बॅन होतात. असे वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्सअॅप खात्यावरून बंदी हटवण्याची विनंती करू शकतात.
व्हॉट्सअॅपने त्यांच्या FAQ पेजवर ही माहिती दिली आहे. जर एखाद्या वापरकर्त्याच्या खात्यावर बंदी घातली गेली असेल तर तो त्याचे खाते उघडू शकणार नाही. स्पॅम किंवा घोटाळ्यांमध्ये गुंतल्यामुळे WhatsApp तुमचे खाते बंद करू शकते.
यासाठी तुम्हाला https://www.whatsapp.com/contact/ पेजला भेट देऊन प्रतिबंध रद्द करण्याची विनंती करावी लागेल. विनंती केल्यानंतर, तुमच्या फोनवर एसएमएसद्वारे 6 अंकी नोंदणी कोड पाठवला जाईल, जो तुम्हाला प्रविष्ट करावा लागेल. यानंतर तुम्ही तुमची रिक्वेस्ट रिव्ह्यूसाठी पाठवू शकता.