Whatsapp Fraud Alert : देशभरात अनेकजण व्हॉट्सॲप (Whatsapp User) वापरतात. त्याचबरोबर, अनेकांची व्हॉट्सॲपवर फसवणूकही (Whatsapp Fraud) होते.
सायबर गुन्हेगार (Cyber criminals) फसवणुकीचा अनेक मार्ग शोधत असतात. जर तुम्हीही अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला तर काही मिनिटातच तुमचे बँक खाते रिकामे (Bank account empty) होऊ शकते.
या चुका करू नका:-
1. जर तुम्ही WhatsApp वापरकर्ते असाल, तर तुमच्यासाठी अज्ञात लिंक्सपासून सावध राहणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला चुकूनही या लिंक्सवर क्लिक करण्याची गरज नाही. त्यावर क्लिक केल्यानंतर ते तुमचा मोबाईल हॅक (Mobile Hack) करून तुमची फसवणूक करण्याचे काम करतात.