Whatsapp New Feature: इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp वर तुम्हाला लवकरच एक नवीन फीचर (Feature) मिळणार आहे. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना नवीन फिचर देण्यासाठी सतत अनेक बदल करत आहे.
आता लवकरच व्हॉट्सअॅपवर मेसेज एडिट (edit messages) करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. WhatsApp च्या नवीन फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo ने या आगामी WhatsApp फीचर्सची माहिती दिली आहे.

लवकरच होणार उपलब्ध
व्हॉट्सअॅपच्या एडिट मेसेज फीचरच्या मदतीने मेसेज पाठवल्यानंतरही आरामात एडिट करता येणार आहे. व्हॉट्सअॅप मेसेज एडिटिंग फीचरचा स्क्रीनशॉटही समोर आला आहे. Wabetainfo ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, WhatsApp एडिट फीचरवर काम करत आहे आणि आता त्याची टेस्टिंग देखील सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉईड बीटा व्हर्जनमध्ये दिसले होते. आता लवकरच सोशल मीडिया कंपनी व्हॉट्सअॅपसाठी हे फीचर जारी करू शकते.
याप्रमाणे कार्य करेल
Wabetainfo च्या रिपोर्टनुसार, या फीचरमध्ये यूजर्स मर्यादित काळासाठी मेसेज एडिट करू शकतील. मात्र, अद्याप याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. पाठवलेला मेसेज एडिट करण्यासाठी वापरकर्त्यांना टेक्स्टवर प्रेस करावा लागेल, त्यानंतर एडिट बटण पॉप-अप होईल, यामुळे मेसेज एडिट करता येईल.
जुने मेसेज तारखेनुसार पाहता येतील
एडिट मेसेजसोबतच तुम्हाला लवकरच व्हॉट्सअॅपवर तारखेनुसार जुने मेसेज पाहण्याचा पर्यायही मिळणार आहे. या फीचरला सर्च मेसेज बाय डेट असे नाव देण्यात आले आहे. या फिचरमध्ये, तुम्हाला सर्च विभागात आणखी एक नवीन कॅलेंडर चिन्ह मिळेल, या चिन्हावर टॅप करून तुम्ही तारखेनुसार मेसेज पाहू शकाल.