फेसबुक, इन्स्टाग्रामसह व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा सुरु; कंपनीनं मागितली माफी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सेवा जगभरात अनेक तास बंद होती. मंगळवारी पहाटेपासून या सेवा पुन्हा सुरु झाल्या आहेत. दरम्यान तब्बल सहा या सेवा ठप्प झाल्यानं नेटकरी हैराण झाले होते.

सोमवारी सुमारे 9 वाजून 15 मिनिटांनी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले होते. जगभरात वेबसाईट वा स्मार्टफोनद्वारे या सेवा वापरता येत नव्हत्या.

हे 3 प्लॅटफॉर्म तब्बल 7 तास डाउन राहिल्यानं जगभरातील वापरकर्त्यांना याचा फटका बसला. डाउन राहिल्यानं फेसबुकच्या शेअरमध्ये तब्बल 5 टक्क्यांची घसरण झाली.

मात्र, इतके तास व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाउन का होतं, हे अद्याप समजलेलं नाही. फेसबुकनं ट्विट करत म्हटलं, की जगभरातील लोक, व्यवसायिक आणि मोठा समुदाय जो आमच्यावर अवलंबून आहे, त्यांची माफी मागतो.

आम्ही आमचे अ‍ॅप्स आणि सेवा पुन्हा सुरळित करण्यासाठी मेहनत घेत आहोत. आता हे सांगताना आनंद होत आहे, की या सेवा पुन्हा सुरळित सुरू झाल्या आहेत.

दरम्यान आतापर्यंतचं या सेवांचं हे सर्वांत मोठं आऊटेज म्हणजेच खंडित राहण्याचा काळ असल्याचं डाऊनडिटेक्टर या सेवांच्या आऊटेजवर लक्ष ठेवणाऱ्या गटानं म्हटलं आहे. जगभरातल्या तब्बल 10.6 दशलक्ष लोकांनी या काळात आपल्याला सेवा वापरता येत नसल्याची तक्रार नोंदवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe