WhatsApp support off: लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँप (WhatsApp) अनेक स्मार्टफोन्ससाठी बंद होणार आहे. निवडक आयफोन मॉडेल्ससाठी व्हॉट्सअॅप बंद केले जात आहे. म्हणजेच 24 ऑक्टोबरनंतर या iPhone मॉडेल्सवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही.
सध्या कंपनीने याबाबत दुजोरा दिलेला नाही. पण वेळ आल्यानंतर व्हॉट्सअॅप त्याची खातरजमा करेल, असा विश्वास आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर याबाबत माहिती देणार्या WABetaInfo या वेबसाइटने वृत्त दिले आहे.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की अॅपल (Apple) आपल्या आयफोन यूजर्सना व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद (WhatsApp support off) करण्याबाबत अलर्ट करत आहे. ही इन्स्टंट मेसेजिंग सेवा iOS 10 किंवा iOS 11 या सॉफ्टवेअर आवृत्तीवर चालणाऱ्या iPhones वर काम करणार नाही.
अशा परिस्थितीत जर तुमचा आयफोन (IPhone) देखील जुन्या सॉफ्टवेअर (Software) वर काम करत असेल तर ते त्वरित अपडेट करा. अन्यथा तुम्हीही तुमच्या iPhone वर WhatsApp वापरू शकणार नाही. तसेच बहुतेक आयफोन वापरकर्त्यांना काळजी करण्याची गरज नाही.
बहुतेक आयफोन मॉडेल नवीनतम सॉफ्टवेअरवर कार्य करतात. याचा परिणाम फक्त दोन आयफोन मॉडेलवर होईल. याचा परिणाम iPhone 5 आणि iPhone 5c वर होईल. म्हणजेच 24 ऑक्टोबरनंतर या iPhones मध्ये WhatsApp काम करणार नाही.
जर तुम्ही आयफोन वापरकर्ता असाल तर तुमचा फोन नवीनतम सॉफ्टवेअर आवृत्तीवर काम करत आहे की नाही हे तुम्हाला तपासावे लागेल. फोनची ऑपरेटिंग सिस्टम (Operating system) तपासण्यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन About मध्ये जावे लागेल. त्यानंतर Software Update वर जा.