अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- होळीचा सण जसजसा जवळ येऊ लागतो तस तसा हळूहळू वातावरणामध्ये बदल दिसायला लागतात. निसर्ग मुक्तपणे रंगांची उधळण करत असते त्याप्रमाणे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या सणाच्या निमित्ताने देखील रंगांची उधळण केली जाते.
दरम्यान उत्तर भारतामध्ये होळीच्या सणाचा थाट मोठा असतो. कोरोनामुळे गेल्या 2 वर्ष होळीचा सण साधेपणाने साजरा झाला आहे तो आता यंदा मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे.
होळी सणाची सुरूवात हुताशनी पौर्णिमेला होळी दहन करून केली जाते. त्यामुळे होळी दहन 17 मार्च 2022 दिवशी होळी पेटवून केली जाणार आहे.
होळी दहनानंतर दुसरा दिवस धुलिवंदनाचा असतो. या दिवशी होळी खेळली जाते. 18 मार्च दिवशी रंगांची उधळण केली जाणार आहे तर रंगपंचमी हा दिवस देखील रंगांनी एकमेकांना भिजवण्याचा आहे. यंदा रंगपंचमी 22 मार्च दिवशी आहे.
हिंदू धर्मात दिवाळी नंतर होळी हा सण मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. त्यामुळे या निमित्त भारताच्या विविध प्रांतांमध्ये निरनिराळे गोडाचे पदार्थ बनवले जातात. होळीच्या निमित्ताने पुरणपोळी, गुज्जिया, थंडाई बनवली जाते.
मुहूर्त : होळी दहन यंदा 17 मार्च दिवशी आहे. या दिवशी रात्री होळी 9 वाजून 6 मिनिटं ते 10 वाजून 16 मिनिटं या वेळेत पेटवली जाणार आहे.