Kaal Bhairav Jayanti 2022 : दरवर्षी कालभैरव जयंती ही हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरा करतात. त्याचबरोबर कालभैरव जयंतीलाच भैरव अष्टमी, काल भैरव अष्टमी, कालाष्टमी असेही म्हणतात.
यंदाची कालभैरव जयंती ही 16 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भैरवनाथाच्या मंदिरात मनोभावे पूजा आणि विधी करतात.
काल भैरव जयंती 2022 तारीख आणि मुहूर्त
काल भैरव जयंती- मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी तारीख बुधवार, 16 नोव्हेंबर 2022
अष्टमी तारीख सुरू होते – बुधवार 16 नोव्हेंबर 2022 सकाळी 05:49 वाजता
अष्टमीची समाप्ती तारीख – गुरुवार 17 नोव्हेंबर 2022, सकाळी 07:57 पर्यंत
भगवान कालभैरवाची उपासना पद्धत
- मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण अष्टमी तिथीला सकाळी स्नान वगैरे करून उपवासाचे व्रत करावे.
- रात्री कालभैरवाची पूजा करण्याचा नियम आहे.
- या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन भैरवाच्या मूर्तीसमोर चारमुखी दिवा लावावा.
- आता फुले, इमरती, जिलेबी, उडीद, पान, नारळ इत्यादी गोष्टी अर्पण करा.
- त्यानंतर त्याच आसनावर बसून भगवान कालभैरवाची चालीसा वाचावी.
- पूजा पूर्ण झाल्यावर आरती करावी आणि नकळत झालेल्या चुकांची माफी मागावी.
या उपायांनी काल भैरव प्रसन्न होईल
शास्त्रात कालभैरवाचे वाहन कुत्रा मानले गेले आहे. कालभैरवाला प्रसन्न करायचे असेल तर त्यांच्या जयंतीदिनी काळ्या कुत्र्याला अन्नदान करावे, असे सांगितले जाते. तर जो कोणी या दिवशी मध्यरात्री चतुर्मुखी दीप लावून भैरव चालिसाचे पठण करतो, त्याच्या जीवनातील राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो.