रोहित पवार हे अनिल देशमुखांबद्दल बोलताच पत्नी आरती देशमुखांचे डोळे पाणावले; म्हणाले, लवकरच..

Published on -

मुंबई : राष्ट्रवादीचे (Ncp) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणात जेलमध्ये आहेत. आज अनिल देशमुख यांचा वाढदिवस असून कार्यकर्ते त्यांच्या सुटकेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

नुकतेच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे काटोल मतदारसंघात (Katol constituency) दौर्यावरती असताना त्यांनी सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या घरी जाणून भेट दिली. या नांतर विविध ठिकाणी विकास कामांच्या भूमिपूजन तसेच उद्घाटन करण्यासाठी ते दौरे करू लागले.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य (Zilla Parishad Member) सलील देशमुख, अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख (Arti Deshmukh) या दौऱ्यात उपस्थित होत्या.

काटोल या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की,अनिल देशमुख यांनी काय चुकीचे केले. तुमचे आमदार दोषी नाहीत. भाजपला (Bjp) वाटत होतं शिवसेना सोबत येईल. पण, आली नाही. महाविकास आघाडी झाल्यावर भाजपच्या पोटात दुखायला लागलं.

यातून सूडबुद्धीनं अनिल देशमुखांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी आरती देशमुख यांचे डोळे पाणावले. तसेच पुढे रोहित पवार यांनी सांगितलं की, भाजप तीन-तीन महिन्यांनी सांगत सरकार पडेल. पण आता तीन वर्षे पूर्ण झालेत. फक्त महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतात.

ईडीवाले शाळेत गेले की नाही मला माहीत नाही. लवकरच अनिल देशमुख बाहेर येतील, असा विश्वास आम्ही देतो. पवार कुटुंब तुमच्यासोबत आहे. पूजा हा व्यक्तिगत विषय आहे. पण स्वत:च्या हितासाठी कोणी राजकारण करत असेल तर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा, असा सल्ला रोहित पवार यांनी यावेळी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe