Maharashtra news : विधान परिषदेच्या निवडणुकी उमेदवारी मागे घेतल्यानंतर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सांगोल्यात वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले.
खोत आपल्या वाहनातून उरतचा एका हॉटेल चालकाने त्यांना अडविले आणि २०१४ च्या निव़णुकीतील जुन्या उधारीत आठवण करून देत ती आधी आणि मगच पुढे जा, असे सुनावले.असे म्हणत सांगोल्याच्या मांजरी गावातील एक हॉटेलचालक व शेतकरी संघटनेच्या माजी पदाधिकारी अशोक शिनगारे यांनी यांनी अचानकच हा पवित्रा घेतला.

२०१४ मध्ये खोत यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, त्या काळातील ही उधारी असल्याचे हॉटेलचालकाचे म्हणने आहे. ‘भाऊ, तुमचे स्वागत. परंतु लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीतील माझी उधारी तेवढी अगोदर द्या.
मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.’ असे शिनगारे यांनी खोत यांना सुनावले.त्यांनी खोत यांना अडवून धरल्याने मोठा गोंधळ उडाला.त्यानंतर मात्र खोत यांनी आपण या हॉटेलाचालकाला ओळखत नसल्याचे सांगून हा राष्ट्रवादी काँग्रेसचे षडयंत्र असल्याचे सांगितले. त्यांनी पोलिसांकडेही तक्रार केली आहे.