अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून कोरोना धोका कमी झालेला नाही. पुढील काळात तिस-या लाटेचा,ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे.(Corona Third Wave)
असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले कि,
नगर जिल्ह्यात लसीचा एकही डोस घेतलेले ९ लाख तर पहिला डोस घेवून मुदत संपलेले पाच लाख लोक आहेत. या सर्वांचे रेशन, पेट्रोल बंद करण्याच्या सूचना प्रशासनाला दिला असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडाचा अहवाल लवकर जाहीर करण्याची सूचना आरोग्यमंत्री यांना करणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी करोना स्थितीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १६२ कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५० हजार प्रमाणे मदत जमा केल्याची माहिती पालकमंत्री यांनी दिली
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम