“द्रोणात आमटी जिकडे पडेल तिकडे तो लवंडतो म्हणून हे लवंडे”

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथे घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेच्या (NCP) नेत्यांना अधिक टार्गेट केल्याचे दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काही नेत्यांवर देखील सडकून टीका केली आहे.

राज ठाकरे यांच्या टीकेला महाविकास आघाडीतील नेत्यांनी खरमरीत शब्दात उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना तसेच पवार कुटुंबियांना अधिक टार्गेट केल्याचे दिसून आले आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, नुसत्या फक्त प्रॉपर्टी अटॅच केल्या तर शिव्या द्यायला लागले पत्रकार परिषदेत. काय पण भाषा पत्रकार परिषदेतील…एक संपादक येतो काय म्हणतो तर *** ****… हे कुठचे आहेत तेच कळत नाही,

हे शिवसेनेचे आहेत का राष्ट्रवादीचे आहेत. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी एक छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी… हे सगळे लवंडे. व वरती अनुस्वार आहे लक्षात ठेवा.

पत्रावळी असते आणि द्रोण असतो. द्रोणात आमटी जिकडे पडेल तिकडे तो लवंडतो म्हणून हे लवंडे. इकडे पडली की शिवसेनेकडे लवंडे, तिकडे पडली की राष्ट्रवादीकडे लवंडे, हे असे लवंडे अशी टीका राज ठाकरे यांनी केली यानंतर राज ठाकरे यांच्या याच टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

संजय राऊत यांनी मोजक्या शब्दात ट्विट करत राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. दिवा विझताना मोठा होतो! हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र!! असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही राज ठाकरे यांच्या टीकेला ट्विट करत उत्तर दिले आहे. 2014 ला मोदींना पाठिंबा… 1019 ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर.

पुतण्या माननीय बाळासाहेब ठाकरेंचा… मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी… वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत. असे म्हणत जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.