“जातील तिथे फाटक्या जोड्यांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे”

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत साठी जमा केलेल्या पैशात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ५८ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

“विक्रांत युद्धनौका (INS Vikrant) वाचवण्यासाठी जमा केलेले 58 कोटी हडपल्याचे एक प्रकरण आता समोर आले आहे. देशातल्या लाखो लोकांनी किरीट सोमय्यांची महाराष्ट्र (Maharashtra) व डब्यांत पैसे टाकले.

त्या लाखो लोकांची फसवणूक झाली. हा पैसा भाजपच्या तिजोरीत गेला नसेल तर मग कुठे पोहोचला ? किरीट सोमय्या व त्याच्या मुलाने सैनिकांचे बलिदान भरबाजारात लिलावात काढले.

भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून कमळाच्या साक्षीने त्यांनी त्यांनी हिंदुत्वाशी हा व्यभिचार केला आहे. कायद्याने कारवाई होईलच, पण अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा.

जातील तिथे फाटक्या जोड्यांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे. सैनिकांच्या बलिदानाचा, हिंदुस्थानी युध्दनौकेचा अपमान देश सहन करणार नाही अशी टीका संजय राऊत यांनी सामानाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावर केली आहे.

देशात अण्णा हजारे किंवा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे कोणी शिल्लक असतील, तर त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराची विक्रांत फाईल तपासायला हवी.

बांग्लादेशच्या युद्धात भारताला विजय मिळवून देणाऱ्या या युद्धनौकेचेही भाजपचे महात्मा किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाने कशा प्रकारे शोषण केले आहे ते बाहेर येईल.

ज्यावेळी विक्रांत युद्धनौका हिंदुस्थानच्या नौदलातून निवृत्त व्हायची वेळ आली होती. त्यावेळी सैन्यदलासह देश सुध्दा हळहळला होता. त्यादरम्यान किरीट सोमय्या यांनी लोकवर्गणीतून युद्धनौकेसाठी आवश्यक असलेला निधी जमा करू असं जाहीर केलं.

मुंबईसह महाराष्ट्रातून आणि व्यापाऱ्याकडून मोठा निधी जमा केला. जमा केलेल्या पैश्यांचं काय केलं? असा प्रश्नही संजय राऊत यांनी अग्रलेखातून विचारला आहे.

जमा केलेला निधी राजभवनाच्या खात्यात जमा करणं आवश्यक होतं. पण डब्यांमधून जमा केलेला निधी गेला कुठे ? राजभवनाच्या खात्यात पैसे जमा न झाल्याचे राज्यपालांनी कळविले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी घोटाळा केल्याचे समोर आले आहे.

किरीट सोमय्यांनी केलेला घोटाळा जाहीर असताना सुध्दा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेते त्यांची पाठीराखण करीत असल्याचं दिसतं आहे. आता किरीट सोमय्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावणार काय? असाही खोचक सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe