Senior Citizen Best Scheme : कोणती बँक देतेय ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वात जास्त व्याज, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

Published on -

Senior Citizen Best Scheme : रिझर्व्ह बॅंकेकडून सतत रेपो दरात वाढ होत आहे. त्यामुळे मुदत ठेवींवरील व्याजदर आता वाढू लागले आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मुदत ठेव हा गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे.

अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करत असल्याचे आपण पाहतो. अशातच अनेक नागरिकांना कोणती बॅँक सर्वात जास्त व्याज देते असा प्रश्न पडतो, जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर बातमी शेवटपर्यंत वाचा.

जाणून घेऊयात एसबीआय, एचडीएफसी बँक,येस बँक,कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक यांनी दिलेले तुलनात्मक व्याजदर

  • एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.25% व्याज दर देत आहे. हे नवीन दर 13 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.
  • एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.5% पर्यंत व्याज देत आहे. हे नवीन दर 14 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.
  • येस बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.5% पर्यंत व्याज देत आहे. हे नवीन दर 9 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.
  • कोटक महिंद्रा बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.5% पर्यंत व्याज देत आहे. हे नवीन दर 15 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.
  • आयसीआयसीआय बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.5% पर्यंत व्याज देत आहे. हे नवीन दर 16 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe