शिवसेनेच्या गोटातील कोणते अपक्ष फुटले? नगर जिल्ह्याकडेही बोट दाखविले जाऊ लागले…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तो अपक्षांची मते फुटल्यामुळे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हेच सांगितले आहे.

पक्षाची मते कायम आहेत, मात्र शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या काही अपक्षांची मते मिळाली नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे यामध्ये कोणाचा समावेश आहे? याची चर्चा सुरू झाली असून त्या दृष्टीने नगर जिल्ह्याकडेही बोट दाखविले जाऊ लागले आहे.

ही मते कशी फुटली, यासंबंधी शिवसेनेचे प्रवक्त संजय राऊत यांनी म्हटले आहे, “आमच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार म्हणजेच पक्षाचे आमदार फुटले नाहीत तर काही अपक्ष आमदार, काही छोट्या पक्षाचे आमदार फुटले आहेत.

कोणाची मते फुटली हे आम्हाला ठावूक आहे. त्यांना काही आमिषं दाखवण्यात आली. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील, पण आम्ही उद्या पाहू. निवडणुकीत असं होत असते.”

असेही राऊत म्हणाले.पवार यांनीही आमदारांना कसे फोडण्यात आले यासंबंधी सांगताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना आपलेसे करण्यात यश मिळविले, अशा सूचक शब्दांत मत मांडले आहे.

भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडला. जो चमत्कार झालेला आहे, तो चमत्कार मान्य केला पाहिजे.

देवेंद्र फडणवीसांना विविध मार्गाने माणसं आपलीशी करण्यात त्या मार्गात त्यांना यश आलं आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नेमके कोणते अपक्ष फुटले याची चर्चा सुरू झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe