Facebook Trick : गुपचूप कोण पाहतंय तुमचं फेसबुक प्रोफाइल? अशाप्रकारे ओळखा

Ahmednagarlive24 office
Published:

Facebook Trick : सध्याच्या काळात अनेकजण सोशल मीडियाचा वापर करत आहेत. त्यामुळे हे सोशल मीडिया आल्यापासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत. यापैकी काहीजण त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो.

परंतु, काहीजण या सोशल मीडियावर गुपचूप इतरांना ट्रॅक करत असतात. त्यामुळे आपले प्रोफाइल आणि फोटो कोण पाहत आहे, हे समजत नाही. परंतु, तुम्ही आता एका सोप्या पद्धतीने प्रोफाइल कोण पाहत आहे ते जाणून घेऊ शकता. कसे ते जाणून घेऊ.

सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या वेब ब्राउझरवर फेसबुक उघडावे लागेल. फेसबुक उघडल्यानंतर लॉगिन करा.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर राईट क्लिक करावे लागेल. क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर अनेक पर्याय दिसायला सुरुवात होईल. येथे तुम्हाला View Page Source चा पर्याय निवडावा लागणार आहे.

तुम्ही Ctrl+U दाबून पृष्ठ स्रोत पाहू शकता. हे पेज उघडल्यानंतर Ctrl + F कमांड द्यावी लागणार आहे. येथे तुम्हाला स्रोत पृष्ठावर BUDDY_ID टाइप करून शोधायचे आहे.

BUDDY_ID मध्ये तुम्हाला 15 अंकी कोड मिळेल. हा कोड कॉपी करावा लागेल आणि नवीन टॅब उघडावा लागेल. टॅब उघडल्यानंतर facebook.com/profile आयडी पेस्ट करावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या प्रोफाइल आयडीमध्ये, तुम्ही कॉपी केलेला १५ अंकी कोड टाकावा लागणार आहे. तुम्ही सर्च करताच, तुमच्या फेसबुक प्रोफाइलला भेट दिलेल्या व्यक्तीचा फेसबुक आयडी तुमच्या स्क्रीनवर उघडेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe