Maharashtra News:अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके यांच्याविरूद्ध एका व्यक्तीने भ्रष्टाचाराची तक्रार केल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात येत नसल्याची भूमिका मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात मांडली होती.
त्यानंतर प्रसार माध्यमांनी तक्रारदार रामलू चिनय्या (रा. रामकुमार चाळ, अंधेरी) या व्यक्तीचा शोध घेतला. त्यावे धक्कादायक माहिती समोर आली आहे. तक्रारीच्या अर्जावर रामलू चिनय्या याचा पत्ता अंधेरीतील होता.
अंधेरीतील रामकुमार चाळीत तो वास्तव्याला असल्याचे तक्रार अर्जावर नमूद करण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी जाऊन शोध घेतला असता या परिसरात रामलू चिनय्या नावाची कोणतीही व्यक्तीच राहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
येथील स्थानिकांनाही रामूल चिनय्याबाबत विचारणा केल्यानतंर याठिकाणी असा कोणत्याही नावाचा व्यक्ती राहत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या एकूणच प्रकरणात संशयाचे दाट धुके निर्माण झाले लटके यांच्याविरोधातील ही तक्रार खोटीच होती आणि लटकेंना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी ती मुद्दाम करण्यात आली होती का,
ही शक्यता आता आणखी बळकट होताना दिसत आहे. कारण ज्या व्यक्तीने लटके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे, तो व्यक्तीच प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहे किंवा नाही, याबाबत शंका आहे.