अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असे म्हटल्यासही वावगे ठरु नये. मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी तर एका वेगळ्या दिवसाची गरज नसते. कारण मित्रांसाठी प्रत्येकच दिवस खास असतो.
पण तरीही जगभरात ऑगस्ट महिन्यात फ्रेन्डशिप डे धडाक्यात साजरा केला जातो. या दिवशी मित्र एकत्र येऊन धमाल करतात. तर काही लोक नवीन मैत्रिच्या नव्या नात्याला सुरुवात करतात. आज आपण जाणून घेणार आहोत खरा मित्र कसा असतो या विषयी…
१ . जो तुम्हाला तुमच्या चुका दाखवेल. २. जो तुमच्या अपयशमध्ये तुमची सोबत देईल.
३. जो तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित करेल.
४. जो तुमच्या तोंडावर तुमचा अपमान करेल. परंतु तुमच्या मागे तुमचा अपमान करणाऱ्याची पुंगी वाजवेल.
५. जो तुम्हाला तुमची किंवा त्याची आर्थिक, सामाजिक, शेक्षणिक पत बघून बदलणार नाही.
६. जो वेळप्रसंगी तुमचा मार्गदर्शक बनेल.
७. जो तुमच्या (चांगल्या) अतरंगी विचारांना खतपाणी देईल आणि तुमचा पार्टनर इन क्राईम बनेल.
खरा मित्र हा निस्वार्थि आणि विश्वासू असतो, मैत्री ही गुणांवर आधारित असावी, ती केवळ उपयोगिता किंवा पोकळ आनंदावर आधारित असु नये. ती निस्वार्थ असावी.मैत्री हे मानवि परिवर्तनाचे एक साधन आहे. खरा मित्र आपणास मर्यादितता, बंदिस्तता, आत्मकेन्र्दिपणा अश्या प्रकारच्या विचारधारेपासुन बाहेर काढु शकतो.
खरा मित्र आपणास मोकळे करतो, खरी मित्रता हा आपल्या एकटेपणावरचा एक उपाय आहे. मैत्री हे एक सकारात्मक कर्म अहे. खरी मैत्री ही आपणास विकसित करावी लागते आणि ती टीकवुन ठेवावी लागते. ती विकसित करण्यासाठी आपणास सातत्याने प्रयत्न करावे लागतात.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम