BIGG BOSS 16 : कोण जिंकेल बिग बॉस 16? सोशल मीडियावर कोणाचे आहे पारडे जड, जाणून घ्या

Updated on -

BIGG BOSS 16 : बिग बॉस 16 ची आता अंतिम फेरी जवळ आली आहे. त्यामुळे यावर्षी बिग बॉसचा विजेता कोण होणार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अशातच आता अंतिम फेरीअगोदर बिग बॉस 16 मधील चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाच्या नावाची संभाव्य विजेता म्हणून मोठ्या प्रमाणावर चर्चा सोशल मीडियावर करत आहे.

यावर्षी स्पर्धक शिव ठाकरे आणि प्रियंका चाहर चौधरी यांच्याकडे विजेतेपदाचे सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. अशातच आता सोशल मीडियावर स्पर्धांकांमधील कोणाचे पारडे जड आहे ते जाणून घेऊयात सविस्तर..

सोशल मीडियावर सुरु आहे ट्रेंड

वापरकर्ते आता सोशल मीडियावर बिग बॉस 16 वर अनेक प्रतिक्रिया देत असून ते ट्विटमध्ये त्यांच्या आवडत्या स्पर्धकाबद्दल बोलत आहेत. काही ट्विटर युजर्सचे म्हणणे आहे की प्रियांका चहर चौधरी बिग बॉस 16 जिंकेल, तर एमसी स्टेन, अर्चना गौतम आणि शालीन भानोट यांचे चाहतेही त्यांना भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

कोणासोबत होणार चुरशीची लढत होणार आणि कधी होणार फायनल

प्रेक्षकांमध्ये बिग बॉस 16 बद्दल उत्साह शिगेला पोहोचला असून चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना खूप शुभेच्छा देत आहेत. महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, एमसी स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत यांच्यात चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल.

येत्या 12 फेब्रुवारी रोजी बिग बॉस 16 चा फिनाले होणार आहे. रविवारी बिग बॉस 16 चा विजेता कोण होईल हे जाहीर केला जाईल. हा शो तुम्हाला सलमान खान होस्ट करत असलेल्या कलर्सवर रात्री 9 वाजता पाहता येणार आहे. तसेच तुम्ही Voot अॅपवर हा शो पाहू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe