Maharashtra News:शिवसेनेतील बंडानंतर गाजलेल्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यात कोण काय आरोप करणार? याची उत्सुकता होतीच. पण सर्वाधिक उत्सुकता होती, ती कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार, याची.
यासंबंधी दोन्ही बाजूंकडून दावेप्रतिदावे केले जात असले तरी पोलिसांकडून नेमका अंदाज पुढे आला आहे. मैदानांची क्षमता आणि एकूण परिस्थिती पाहून पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मेळाव्याला अधिक गर्दी असल्याचा अंदाज दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला १ लाख तर मुख्यमंत्री शिंदेंच्या मेळाव्याला २ लाखाची गर्दी होती, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शिवाजी पार्कची क्षमता ही ८० हजारांची आहे.
तर बीकेसी मैदानाची क्षमता १ लाख इतकी आहे. गेल्या काही वर्षांची तुलना करता उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला आतापर्यंतची सर्वाधिक गर्दी होती, असेहा सांगण्यात येत आहे.
बीकेसीतील शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला अधिक गर्दी होती, असे ठाकरे गटानेही मान्य केले आहे, मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण वाचण्यास सुरुवात करताच ५० टक्के लोक सभेतून निघून गेले, असा दावाही करण्यात आला आहे.