Maharashtra news : मागील दोन महिन्यांमध्ये करोना रुग्णसंख्येचा १०० रुग्णांचा टप्पा पार न करणाऱ्या मुंबईमध्ये काल दिवसभरात ७३९ रुग्णसंख्येची नोंद झाली.
पर्यटन, इतर देशांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या, चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण, तसेच विषाणूच्या बदलत्या स्वरूपामध्ये करोनाचा फैलाव पुन्हा होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा फैलाव हा शहराकडून ग्रामीण भागाकडे, त्यानंतर तो ग्रामीण भागातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये झाला होता. त्यामुळे मुंबईत वाढत असलेल्या रुग्णसंख्येकडे गांभीर्याने पाहण्यात येत आहे.
विषाणूच्या उत्परावर्तित स्वरूपामुळे ही रुग्णवाढ आहे का? यादृष्टीने विचार केला जात आहे. रुग्णवाढीचा वेग धीमा असून मृत्यूसंख्या वाढलेली नाही, असेही आढळून येत आहे. राज्यात काल १ हजार ८१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर ५२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोविड-19 मुळं एकाही मृत्युची नोंद काल झाली नाही.