Semiconductor plant : फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प (Foxconn-Vedanta project) गुजरातला (Gujarat) गेल्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण चांगलंच ढवळून निघाले आहे.
हा प्रकल्प (Foxconn-Vedanta) महाराष्ट्रात उभारला जाईल अशी चर्चा होती. यावर आता वेदांतचे चेअरमन अनिल अग्रवाल (Anil Aggarwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मूल्यांकन व्यावसायिक पद्धतीने केले गेले
गुजरातची निवड केल्याने अनेकांना, विशेषत: राजकीय क्षेत्रातील मंडळींना आश्चर्य वाटले. वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
प्रत्यक्षात वेदांताच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत संभाव्य प्लांटबाबत अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या होत्या.
याबाबत, वेदांत चेअरमन म्हणाले की त्यांची कंपनी आणि फॉक्सकॉन (Foxconn) अनेक अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या प्लांटच्या जागेचे व्यावसायिक मूल्यांकन करत आहेत.