मलिकांचा राजीनामा का घेत नाही? धमकी पवारांची की दाऊदची? सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

Published on -

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर डी- गॅंग सोबत संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) मध्ये आरोप सत्र सुरु आहे. आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोमय्या म्हणाले, साडेचार महिने झाले. शिवसेना नेते संजय राऊत रोज मनोरंजन करतात. आता राज्यातील जनता त्यांच्यावर हासत आहे. ऑडिटपासून जे काही ते बोलत आहेत, ते सर्व ऑनलाईन आहे. उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राऊत हे इश्यू डायव्हर्ट करत आहेत.

मलिक दाऊद संबंध बाहेर येणार हे माहीत होतं. म्हणून लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होता. दाऊदशी संबंध असल्याचं सिद्ध झाल्यानंतरही मलिकांना मंत्रिमंडळातून काढलं जात नाही. धमकी शरद पवारांची आहे की दाऊदची आहे? असे प्रश्न सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, नवाब मलिक म्हणजे दाऊद हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब या रस्त्यावर पवारांसोबत आणि न्यायालयाविरोधात काढा मोर्चा.

नाही तरी तुमचे प्रवक्ते रोज न्यायालया विरोधात बोलतात. न्यायालयपण पाकिस्तानचे आहे आणि न्यायाधीशपण मोदींचे आहे, असं म्हणायला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली तर आश्चर्य वाटणार नाही असा टोमणाही सोमय्यांनी मारला आहे.

सोमय्यांनी मुख्यमनातरी उद्धव ठाकरे यांनाही चांगलेच घेरले आहे. वास्तविकरित्या ही चौकशी न करता शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना मलिकांचा सर्व आर्थिक व्यवहार माहीत होता. हा कॉमनसेन्स आहे.

उद्धव ठाकरे स्वत: बिल्डर आहेत. त्यांचा मुलगाही बिल्डर आहेत. असे व्यवहार बिल्डर लोकांना लगेच कळतात. त्यांच्या मातोश्रीपासून चार किलोमीटरवर गोवावाला कंपाऊंड आहे.

उद्धव ठाकरेंना त्याचा एफआयएस काय होता हे माहीत नाही? उद्धव ठाकरेंचे एजंट यशवंत जाधवांनी काही वर्षात 53 जुन्या इमारती घेतल्या. मलिक यांनी शंभर कोटींचा टर्न ओव्हरचा प्लॉट घेतला.

त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. आता उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावं लागणार आहे. तुमचे आणि दाऊदचे काय संबंध आहेत हे सांगावं लागणार आहे. काय बोलणार आहात?, असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत.

1992-93मध्ये दंगली झाल्या. पवार आणि दाऊद एका विमानात गेले असं बाळासाहेब त्यावेळी भाषणात बोलायचे. बाळासाहेबांची ही भाषणं मी ऐकली आहेत. पण उद्धव ठाकरेंनी केवळ मुख्यमंत्रीपदासाठी सर्व गुंडाळून ठेवलं आहे, अशी टीका त्यांनी केली.

गुन्हा सिद्ध होण्याचं काही राहिलचं नाही. ठाकरे परिवार आणि सरकारने घोटाळे केले. आता महाराष्ट्रातील जनता शिक्षा करणार असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe