“ही वेळ का आली खरं आणि खोटं हिंदूत्व दाखवण्याची, बाळासाहेबांना सांगावं लागलं नव्हतं”

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, शिवसेनाला त्यांचं हिंदूत्व (Hindutava) सांगावं लागतं, यातच सर्व काही आलं. बाळासाहेबांना सांगावं लागलं नव्हतं हिंदूत्व घेतोय. जनतेने त्यांना हिंदूहृदय सम्राट बनवलं. आता ही वेळ का आली खरं आणि खोटं हिंदूत्व दाखवण्याची असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

सभा घेऊन उत्तर देणार आहेत चांगलं आहे. पण त्यांची सभा झाल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सुद्धा सभा घेऊन उत्तर देतील असा इशाराही प्रवीण दरेकरांनी दिला आहे.

सेनेचा बेस हलतो म्हणून आता सांगावं लागतं. काका मला वाचवा हिंदुत्वाची आमची भूमिका घेऊ नका असे म्हणून आदित्य ठाकरे अयोध्येत जात आहेत असा खोचक टोलाही दरेकरांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी पाच वर्षे काम केलं पुन्हा लोकांनी निवडून दिले. हिटलर वाटले असते तर लोकांनी निवडून दिले नसते. त्यामुळे क्षमता नसताना राऊत यांनी बोलू नये, असा पलटवार दरेकरांनी केला आहे.

तसेच उत्तर प्रदेशातील खासदार यांनी राज ठाकरे यांच्याबाबत घेतलेली भूमिका वयक्तिक आहे. त्याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील, असेही ते म्हणाले, तर नवनीत राणा यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले.

एक महिला खासदार आहे, त्यांचा छळ केला गेला. हे लोकांना माहित आहे. सरकारला कोर्टाने फटकारलं आहे. भाजप सूडबुद्धीने कारवाया करत नाही. पण हे सरकार यंत्रणेचा वापर करत आहे. तसेच राज्यातील परिस्थिती योग्य नाही. ह्या परिस्थितीमुळे राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा इशाराही दरेकरांनी दिला आहे.

भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही शिवसेनेवर तोफ डागली आहे. ज्यांच्या रक्तात हिटलरशाही ते कुणावरही टीका करतात. मोदींवर टीका करण्याची लायकी, ताकद आणी अक्कल त्यांच्यात नाही.

पात्रता नसलेल्या छोट्या राऊतांनी मोदींवर बोलू नये, अशी सडकून टीका शेलारांनी केली आहे. तसेच लागलेले पोस्टर्स आणि मजकूर यावरून सेना सभेस लोक येतील यावर त्यांचाच विश्वास उरलेला नाही. 15 मेची भाजप सभा पूर्वनियोजित आहे. ती 14 जूनच्या सेनेच्या सभेला उत्तर देण्यासाठी नाही, असे ही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe