Apple : ॲपल कंपनीचे आयफोन ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. तसेच अनेकांचे आयफोन घेण्याचेच नाही तर इतर उत्पादने घेण्याचे स्वप्न असते. मात्र बजेट कमी असल्याने अनेकांना ते घेणे शक्य होत नाही.
मात्र आता कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण दोन उत्पादनांची किंमत 10 हजारांनी वाढवण्यात आली आहे. कंपनीकडून नुकतेच Apple ने नुकतेच HomePod (2nd Gen) भारतात 32,900 रुपयांना लॉन्च केले आहे.

कंपनीने देशामध्ये HomePod मिनी स्मार्ट होम स्पीकरच्या किमतीत वाढ केली आहे. याशिवाय, तीन 24-इंचाच्या iMac व्हेरिएंटच्या किमतीही 10,000 रुपयांनी वाढल्या आहेत.
कंपनीकडून अजून दरवाढीबतात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र ग्राहकांना आता जास्त पैसे मोजून HomePod घ्यावा लागणार आहे. लवकरच कंपनीकडून याबाबत खुलासा केला जाऊ शकतो.
नवीन किंमत
होमपॉड मिनीची भारतातील किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे. अगोदर या होमपॉड मिनीची किंमत 9,900 रुपये होती. आता 10,900 रुपये मोजून हे खरेदी करावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे 24-इंचाच्या iMac मॉडेलच्या किमतीही वाढल्या आहेत. 7-कोर GPU आणि 256GB स्टोरेजसह 24-इंच iMac ची किंमत 1,19,900 रुपयांवरून 1,29,900 रुपयांपर्यंत वाढली आहे. जवळजवळ 10 हजार रुपयांनी याची किंमत वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, 8-कोर GPU आणि 256GB स्टोरेजसह 24-इंच iMac ची किंमतही वाढवण्यात आली आहे. अगोदर या उत्पादनाची किंमत 1,39,900 रुपये होती तसेच आता नवीन किंमत 1,49,900 रुपयांपर्यंत झाली आहे.
तर 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत अगोदर 1,59,900 रुपये होती. तर आता नवीन किंमत 1,69,900 रुपये करण्यात आली आहे. सर्व नवीन किमती Apple India च्या साइटवर थेट आहेत.