अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत,
कडी लावून, अशी टीका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवर ट््विट करून केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका सुरू केली आहे.
आमदार भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ. काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला…
दरम्यान, मराठा आरक्षण कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यात कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींचा असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोट ठेवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा कायदा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली.
यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही निशाणा साधला आहे. ‘उद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, असे नाटक तुम्ही का करत आहात? ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला आहात
त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही आणि यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार आहात, असे म्हणत ट्विटद्वारे चंद्रकात पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|