Ahmednagar Crime : तुमच्या पाळीव कुत्र्याला रात्रीच्या वेळी बांधुन का ठेवत नाहीत ? म्हणत जोडप्याला बेदम मारहाण

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : तुमच्या पाळीव कुत्र्याला रात्रीच्या वेळी बांधुन का ठेवत नाहीत, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी दोघा पती पत्नीला लाथा बुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण केली. राहुरी तालुक्‍यातील चांदेगाव येथे नुकतीच ही घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ता नारायण गायकवाड (वय ४०, रा. चांदेगाव ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, मुक्ता गायकवाड यांच्या शेजारी त्यांचे भावबंध राहण्यास असून ते नेहमी काही ना ‘काही कारणावरुन वाद घालत असतात.

(दि. २५) ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुक्‍ता गायकवाड यांचे पती नारायण मच्छिद्र गायकवाड हे मोटारसायकलवरुन घरी येत असताना दत्तु मच्छिद्र गायकवाड यांचा पाळलेला कुत्रा मोटारसायकलच्या मागे धावला.

तेव्हा नारायण मच्छिद्र गायकवाड हे भगवान मच्छिंद्र गायकवाड यांना म्हणाले की, रात्रीच्या वेळी तुम्ही कुत्र्याला बांधुन का ठेवत नाही? असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने चार आरोपींनी मिळुन मुक्ता गायकवाड व त्यांच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण केली.

या घटनेत नारायण मच्छिद्र गायकवाड हे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मुक्ता नारायण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी भगवान मच्छिंद्र गायकवाड, शेखर चांगदेव गायकवाड, वनिता चांगदेव गायकवाड, अलका दत्तु गायकवाड (सर्व रा. चांदेगाव, ता. राहुरी) या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe