Airtel 5G Plus: तुमच्या फोनमध्ये Airtel 5G काम करेल का? या अॅपद्वारे कळेल एका क्षणात; जाणून घ्या कोणते आहे हे अॅप…….

Airtel 5G Plus: एअरटेल 5G प्लस (Airtel 5G Plus) सेवा भारतात लाँच झाली आहे. ही सेवा अधिकृतपणे 8 शहरांमधून सुरू झाली आहे. परंतु, तुम्हाला ही सेवा मिळेल की नाही, तुम्ही त्याबद्दल जाणून घेऊ शकता. सध्या मुंबई (Mumbai), दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसीचे वापरकर्ते Airtel 5G सेवा तपासू शकतात.

कंपनीने असेही म्हटले आहे की, यासाठी तुम्हाला तुमचे एअरटेल 4G सिम कार्ड (Airtel 4G SIM Card) 5G वर अपग्रेड करण्याची गरज नाही. परंतु, तुमचे डिव्हाइस 5G सक्षम (Device 5G enabled) असणे आवश्यक आहे. हे तपासणे अगदी सोपे आहे. त्याची संपूर्ण पद्धत येथे सांगितली जात आहे.

तुम्ही Airtel 5G Plus वापरू शकता का?

तुम्ही वर उल्लेख केलेल्या शहरात राहत असाल तर तुम्ही ते तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये एअरटेल Thanks अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर अॅप उघडा. अॅपच्या होमपेजवर तुम्हाला 5G Plus चे बॅनर दिसेल.

तुमचा फोन 5G सक्षम आहे की नाही हे या बॅनरमध्ये लिहिले जाईल. बॅनरवर टॅप केल्याने एक नवीन पृष्ठ उघडेल. यानंतर कंपनी तपासेल की, तुम्ही 5G रेडी शहरात आहात की नाही. याशिवाय, 5G हँडसेटची सुसंगतता देखील तपासली जाईल.

सेटिंग बदलावी लागेल –

दोन्ही गोष्टी तपासल्यानंतर Airtel तुम्हाला Settings वर जाण्यास सांगेल. यासाठी तुम्हाला फोनची सेटिंग्ज (phone settings) ओपन करून नेटवर्क पेजवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला पसंतीच्या नेटवर्कमध्ये 5G निवडावा लागेल. यानंतर तुमच्या फोनमध्ये 5G चे चिन्ह येऊ लागेल.

सध्या सर्व स्मार्टफोन 5G ला सपोर्ट करणार नाहीत. यासाठी कंपनीकडून लवकरच अपडेट जारी करण्यात येणार आहे. तुम्ही फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेटवर (software update) जाऊन हे अपडेट तपासू शकता. हे अपडेट आल्यानंतरच बहुतांश फोनमध्ये 5G काम करेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe