शहरातील रस्त्यांची दुर्दशा दूर करणार : आमदार आशुतोष काळे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न असून पुढील काळात कोपरगावातील रस्त्याची दुर्दशा संपवू, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

विविध योजनांतर्गत ६८ लाख ३८ हजार निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. नगरविकास खात्याकडून काही दिवसांपूर्वी शहरातील विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.

धारणगाव रोडसाठी २ कोटी, प्रशासकीय इमारतीसमोरील बगीचा १ कोटी, प्रशासकीय इमारत कंपाउंड ५० लाख, बाजारतळ स्मशानभूमीचा विकास १ कोटी, मोहनीराजनगर स्मशानभूमीचा विकास ५० लाख ही कामे त्यातून केली जातील.

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण करून पुढील कामासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी शासनदरबारी अनेक प्रस्ताव दाखल आहेत.

टप्प्याटप्प्याने मंजुरी मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सुधाकर रोहोम संदीप वर्पे, धरमशेठ बागरेचा, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, प्रशांत चिमणपुरे, अतुल कोताडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe