DA Hike Update : अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी (Central Staff) महागाई भत्त्याच्या (DA) वाढीची आतुरतेने वाट पाहत आहे. कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता नवरात्रीच्या काळात दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
त्यामुळे आता सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार का? याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
पण यावेळी डीएमध्ये किती टक्के वाढ होणार? हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा सात टक्क्यांवर पोहोचला आहे.
सात टक्क्यांपेक्षा कमी असताना डीए चार टक्क्यांनी वाढवता (DA increase) येईल, असे बोलले जात होते. ऑगस्टमध्ये वाढलेल्या महागाई दराचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीवर दिसून येईल का?
DA हा पगाराच्या संरचनेचा भाग आहे