ChatGPT : चॅटजीपीटीमुळे धोक्यात येणार तुमची नोकरी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published on -

ChatGPT : आपल्याला कोणतीही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा आपल्याला कोणताही प्रश्न पडला असो, आपण लगेच गुगलच्या मदतीने त्याचे उत्तर शोधायला लागतो. त्यावरही चुटकीसरशी माहिती मिळते. येतेच नाहीतर आपल्या प्रश्नाशी निगडित कितीतरी माहिती त्यावर येते.

परंतु, आता फक्त प्रश्नच नाही तर आपल्यासाठी कथा, कविता, पटकथा, निबंध यांसारखी सर्व माहिती देणारे एक भन्नाट तंत्रज्ञान वापरासाठी तयार आहे. चॅटजीपीटी असे त्याचं नाव आहे. परंतु, आता याच चॅटजीपीटीमुळे नोकरी धोक्यात येणार का असा प्रश्न अनेकांना पडत आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर.

आज गृहपाठ करण्यासाठी किंवा कोणत्याही विषयावर लेख लिहिण्यासाठी ChatGPT चा वापर केला जात आहे. चॅटजीपीटी आल्यानंतर गृहपाठ करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार असल्याचा विश्वास इलॉन मस्क यांना आहे.

आज अशी अनेक गुंतागुंतीची कामे आहेत, जो फक्त माणूसच करू शकतो.तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही झपाट्याने विकास होत आहे.

त्यामुळे आता किती अवघड काम आर्टिफिशियल इंटेलिजन्सही करू शकणार आहे. ChatGPT हे या क्षेत्रातील एक मोठे पाऊल आहे.

येत्या काळात याचा वापर कंटेंट निर्मिती, शिकवणे, ग्राहक सेवा, उत्पादन वितरण, कॅब सेवा अशा अनेक कामांमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागू शकते. ChatGPT हे या मोठ्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News