Infinix Smart 6 HD : मिळणार नाही पुन्हा अशी संधी! 5G स्मार्टफोन मिळतोय 599 रुपयांना

Published on -

Infinix Smart 6 HD : 1000 रुपायांपेक्षाही कमी किमतीत तुम्ही स्मार्टफोन विकत घेऊ शकता. होय, आता Infinix Smart 6 HD या स्मार्टफोनवर ही सुवर्णसंधी मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने हा स्मार्टफोन लॉंच केला होता. 

त्यावर आता सवलत मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा 5G स्मार्टफोन आहे. मार्केटमध्येही याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही संधी फ्लिपकार्टवर मिळत आहे.

जबरदस्त फीचर्स असणारा Infinix Smart 6 HD तुम्ही केवळ 599 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये 5000 mAh बॅटरी कंपनीने दिलेली आहे. तसेच इतर फीचर्सही कंपनीने दिली आहेत.

1. सवलत ऑफर

या स्मार्टफोनची किंमत 8,000 रुपये असली तरी फ्लिपकार्टवर त्याची किंमत कमी आहे. 35 टक्के डिस्काउंटनंतर तो 5,799 रुपयांना मिळत आहे. अधिक डिस्काउंटसह फोन खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर इतर ऑफर दिल्या आहेत.

2. एक्सचेंज ऑफर

यावर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येत आहे. त्यासाठी, तुमच्याकडे उत्तम कंडिशनचा स्मार्टफोन असावा. Infinix Smart 6 HD Flipkart वर 5,200 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटसह विकला जात आहे. जर याचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळाला तर या फोनची किंमत फक्त 599 रुपये असू शकते.

3. फ्लिपकार्ट ऑफर

Infinix Smart 6 HD शिवाय दुसऱ्या स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्टवर डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये Oppo Reno 7 5G, Moto E40, Moto G51, iPhone 12 mini इत्यादी दिग्गज कंपन्यांच्या स्मार्टफोन सवलतीसह उपलब्ध आहेत. त्यावरही 2 हजार ते 3 हजार रुपयांची सूट आहे.

Infinix Smart 6 HD स्मार्टफोन तपशील

यामध्ये 6.6 TFT LCD डिस्प्ले आहे, जो 60 hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर यामध्ये कंपनीने 5000 mAh बॅटरी दिली असून ती 5W चार्जिंगला सपोर्ट करते. फोन MediaTek च्या Helio A22 SoC वर काम करतो. यामध्ये तुम्हाला 2 GB रॅम आणि 32 GB इंटरनल स्टोरेज मिळत आहे.

फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर Infinix Smart 6 HD च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दिला आहे, ज्यामध्ये 8-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सल कॅमेरा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News