बापरे! भविष्यात फक्त मुलीच जन्म घेणार? गुणसुत्रांत होतायत मोठे बदल

Published on -

मनुष्य प्राण्यांमध्ये मुलगा की मुलगी हे ठरविण्याचे काम करणाऱ्या वाय या गुणसुत्रात हळूहळू बदल होत आहेत. ते असेच होत राहिले तर भविष्यात वाय गुणसूत्र कमकुवत होऊन दोघांच्या एक्स गुणसूत्रांचाच संयोग होऊन केवळ मुलीच जन्माला येण्याची शक्यता आहे.

यावर सध्या सोशल मीडियात तज्ज्ञांमध्ये घमासान चर्चा सुरू आहे. अर्थात हा बदल नजीकच्या भविष्यात नव्हे तर ११ मिलियन वर्षांनंतर होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रत्येक सजीवाच्या जनुकीय द्रव्यामध्ये गुणसूत्रांच्या ठराविक जोड्या असतात.

मनुष्यप्राण्यामध्ये ही गुणसूत्रांच्या जोड्यांची संख्या २३ एवढी असते. त्यातील २२ जोड्या स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्ये सारख्या असतात. जन्माला येणारे बाळ मुलगा असणार, की मुलगी, ही बाब या गुणसूत्रावर अवलंबून असते. स्त्रियांमध्ये या तेविसाव्या जोडीत एक्स आणि एक्स (XX) अशी गुणसूत्रे असतात,

तर पुरुषांमध्ये एक्स आणि वाय (XY) या गुणसूत्रांनी ही जोडी बनते. पुरुषाकडून आलेले एक्स गुणसूत्र आणि स्त्रीकडून आलेले एक्स गुणसूत्र एकत्र आले, तर नवा गर्भ स्त्रीलिंगी (XX) असतो; पण स्त्रीकडून आलेल्या एक्स गुणसूत्राची गाठ पुरुषाकडून आलेल्या वाय गुणसूत्राशी पडली,

तर जन्माला येणारे मूल पुरुष (XY) असते. यातील वाय गुणसूत्रासंबंधी सध्या चर्चा सुरू आहे. ट्विटरवर सुरू असलेल्या या चर्चेला डॉ. विद्या देशमुख यांनी प्रतिसाद देत म्हटले आहे की, हे खरय की Y chromosome हा shrink होतोय ..!! म्हणजे असे की,

Y गुणसूत्रावर सध्या 27 – 30 gene आहेत जे महत्वाचे प्रोटीन बनवतात. याउलट x गुणसूत्रावर मात्र 800 gene आहेत जे शरीरातील इतर biological activity मधे उपयोगी आहेत. यावरून अंदाज येतो की Y गुणसूत्र किती छोटे आहे.

म्हणजे भविष्यात केवळ स्त्रिया असतील व पुरुष असणार नाही… असं नव्हे ..!! तर पुरुषही असतील पण त्यांची ओळख असलेला Y chromosome नष्ट होईल. व तोपर्यंत त्याची दुसरी ओळख निर्माण झाली असेल.

कदाचित, आताप्रमाणे XY – XX हा पॅटर्न न राहता XO – XX हा pattern राहील. किंवा जो महत्त्वाचा crucial gene Y chromosome वर आहे SRY त्याला trigger करणारा SOX9 हा gene lead घेईल व तोच ठरवेल कोणतं sex असेल ते. हा gene autosomal आहे chromosome3 वर.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe