वायररोपच्या साहाय्याने एटीएम उपसून नेले…मात्र आता

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  पारनेर तालुक्यातील जवळा येथील शिरूर रोड लगत असलेले ए.टी.एम मशिन बोलेरो जिपच्या साहाय्याने वायररोप लावुन ओढुन घेवुन जाणाऱ्या भामट्यांना पारनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे.(Ahmednagar Crime)

त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती अशी,पारनेर तालुक्यातील जवळा येथील शिरूर रोड लगत असलेले ए.टी.एम मशिनसह त्यातील ३ लाख २८हजार ७०० रुपये कोणीतरी अज्ञात आरोपींनी दि.१५ डिसेंबर रोजी चोरुन नेली.

या संदर्भात पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास पारनेरचे पोलीस करत असताना शतीक शिवाजी बेंद्रे (रा. पिंपळनेर) यास ताब्यात घेवून चौकशी करत असताना त्याने माहीती देण्यास टाळाटाळ केली.

परंतु त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हयाची कबुली देवुन गुन्हा हा त्याचे इतर ७ साथीदारांसोबत केल्याची माहिती दिली. त्यांना देखील अटक करण्यात आली.

ऋतक शिवाजी केंद्रे, उमेश हरिभाऊ सातपुते, तुषार रखमाजी पवार, दिनेश हरिभाऊ सातपुते (सर्व रा.पिंपळनेर ता. पारनेर जि.अहमदनगर) आकाश उर्फ बुग्या सुभाष पाचुदकर,

सुर्यकांत उर्फ काळया शंकर धुमाळ ( रा. रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. त्याना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यांच्यावर विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News